वारजे पोलिसांनी चोरीचे १२ लॅपटॉप,०७ लॅपटॉप चार्जर, ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा व ०२ दुचाकी केले जप्त..


उच्चशिक्षित गुन्हेगाराकडून एकून १२ लॅपटॉप ०७ लॅपटॉप चार्जर ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा, ०२ दुचाकी जप्त करुन पुणे शहर तसेच महाड शहर पोलीस स्टेशन जिल्हा रायगड व मानगाव पोलीस स्टेशन जिल्हा रायगड येथील एकुन०८ गुन्हे उघडकीस आणुन एकुन ६,४४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाल आहे.

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये कॉलेज परिसरातील बिल्डींग/हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांनी बुट अथवा दरवाजाजवळ ठेवलेली चावी वापरून विद्यार्थ्यांचे रुममध्येच चार्जिंगला लावलेले किंवा रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल होता.

अशा प्रकारे वारंवार घडणा-या गुन्ह्यांचा अभ्यास करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल जैतापुरकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अजय कुलकर्णी यांनी तपास पथकातील अधिकारी श्री नरेंद्र मुंढे यांना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्यासाठी योग्य त्या सुचना देवून कर्वेनगर कॉलेज परिसरात तपास पथकातील अमलदार यांना पेट्रोलिंग करण्या बाबत व सापळा लावून कारवाई करण्या बाबत सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी नरेंद्र मुंढे व तपास पथकातील स्टाफ पोलीस घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील प्राप्त फुटेज मधील लॅपटॉप चोरी करण्याच्या संशयित इसमाचा शोध घेत असताना पोउपनिरी मुंढे यांनी तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून सापळा लावून नमूद स्टाफसह फुटेज मधील इसम अर्जुन तुकाराम झाडे, वय- २२ वर्षे याला ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

मिळुन आलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता नमूद गुन्ह्यातील चोरीला गेलेले लॅपटॉप त्याच्या कडे मिळुन आल्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील वारजे कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड या परीसरातून लॅपटॉप चोरी केले असल्याची तसेच तो यापूर्वी महाड रायगड येथे शिक्षणासाठी असताना त्याने महाड व मानगाव येथे दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली कंपनीचे एकून १२ लॅपटॉप, ०७ लॅपटॉप चार्जर ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा ०१ हेडफोन ०२ दुचाकी असा एकून ६,४४,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी श्री नरेंद्र मुंडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०३ श्री.सुहेल शर्मा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग श्री निमराव टेळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन श्री सुनिल जैतापुरकर व पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुळे,रामेश्वर पावे, पोलीस अमलदार प्रदिप शेलार हनुमंत मासाळ अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे श्रीकांत भांगरे अजय कामठे, अमोल सुनकर राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांनी केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »