तहसील कार्यालय हवेली जिल्हा पुणे येथील शाशकीय कर्मचारी करत आहे कामामध्ये दिरंगाई आणि मनमानी
पुणे – दिनांक १७/१२/२०२४ :- सविस्तर वृत्त असे कि सौ रिना तोरसकर रा काळेपडळ हडपसर पुणे यांनी तहसील कार्यालय हवेली येथे दिनांक ११/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार प्लॉट च्या क्षेत्रफळ दुरुस्थिसाठी अर्ज केला होता.अर्ज करून जवळपास तीन वर्ष होत आहेत परंतु आजतगायत त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला नसून त्यांना तहसील कार्यालय हवेली येथे सारख्या चकरा माराव्या लागत आहे.त्यामुळे त्यांना आर्थिक ,शारिरीक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यांच्या वकिलांनी श्री सिनीअर क्लार्क प्रमोद भांड, तहसीलदार श्री सुरवसे साहेब यांच्याकडे बर्याच वेळा काम करण्यासाठी विनंती केली. परतू सदर अधिकारी यांनी टाळाटाळ करत अर्ज निकाली काढला नसून कामामध्ये दिरंगाई करत मनमानी करत आहे.यावरून शाषन आणि शाशकीय अधिकारी यांच्यावरील जनतेच्या विश्वास कमी होत चाललेला आहे. दफ्तर दिरंगाई कायदा ह फक्त कागदावर दिसत आहे. अंमलबजावणी कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे सौ रिना तोरसकर यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.आणि त्याचे रखडलेले काम केव्हा होईल ? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.